आपलया सर्वांच्या आवडत्या मराठी कविता, चित्रकविता, लेख, चारोळ्या आणि आणखी बरेच काही. मराठी कविता ब्लॉग मध्ये १५०० पेक्षा जास्त मराठी कवितांचे संकलन आहे.
विठ्ठल गीती गावा , विठ्ठल चित्ती ध्यावा । विठ्ठल उभा पहावा विटेवरी ।। १ ।। अनाथांचा बंधू विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाशा ।।२।। तोचि शरणागता विठ्ठल मुक्तिदाता । विठ्ठल या संता समागमे ।।३।। विठ्ठल गुणनिधी विठ्ठल सर्व सिद्धी । लागली समाधी विठ्ठल नामे ।।४।। विठ्ठलाचे नाम घेता झाले सुख । गोडवले मुख तुका म्हणे ।।५।।